LOKSANDESH NEWS
खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचे घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना वन अधिकाऱ्यांनी पाडले असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई होईल - गणेश नाईक
On वन विभाग बैठक
- 65 टक्के वन विदर्भात असून आणि वनविभागाचे बहुतांशी कार्यालय ही विदर्भात नागपुरात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सूचना देण्यासाठी आज आणि उद्या वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. प्रामुख्याने वाघ आणि मानवी संघर्ष संदर्भात तसेच वाघांच्या मृत्यू बद्दल या बैठकीत चर्चा करणार आहोत. वन विभागाचे उत्पन्न वाढावे यासाठी वन विकास महामंडळ, मॅग्रोव्ह डिव्हिसन आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.
- महाराष्ट्राचा वनक्षेत्र 21% टक्के वरून 30% व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहे
On खोक्या भोसले घर पाडकाम
- वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसले च्या कुटुंबीयांचा घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडला असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकाऱ्यांनी घर पाडले असतील तर चौकशी अंती वनाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल
On ठाणे जनता दरबार
- आम्ही महायुतीत आहोत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमदारांना कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काहीही वावगं नाही
On राज्यमंत्री अधिकार
- 1995 मध्ये युती झाली होती. तेव्हापासूनच मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामाचे वाटप केले होते. त्यानुसारच राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जातील असा विश्वास आहे
On सातारा प्रकल्प
- मुनावडे सातारा जिल्ह्यात या जल प्रकल्पाचे काम कोणीही थांबवलेलं नाही. कोणताही प्रकल्प सुरू करताना पर्यावरण विभाग आणि वनविभागाची औपचारिक परवानगी आवश्यक असते. त्या अनुषंगाने दोन्ही खात्यात कागदपत्रांचा आदान प्रदान होईल. कोणताही प्रकल्प अडवण्याचा कारण नाही कोणीही अडवणार नाही. महायुती च्या तिन्ही नेत्यांनी राज्यात कुठल्याही भागात जनतेसाठी प्रकल्प करण्याचा ठरवलं, तर महायुतीचे सर्व नेते त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील
On नवी मुंबई
- डीपीएस शाळेच्या बाजूला फ्लेमिंगोचे आधी दर्शन व्हायचं. मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणी थांबवलं. त्यामुळे फ्लेमिंगोच येणं थांबलं. मी आमदार असताना ते पूर्ववत करण्यास सांगितले होते, आता मंत्री झाल्यानंतर मी सिडकोचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. आता सिडको, महापालिका आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी पूर्वीसारखे तिथे फ्लेमिंगो आले पाहिजे, याची व्यवस्था करावी. लोकांना फ्लेमिंगो चे दर्शन झाले पाहिजे.