| बाळापुर तालुक्यातील वाडेगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान
अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाळापुर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला आहे.
या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या वाऱ्यामुळे केळी झाडे पडल्याने केळीचे घड अक्षरशः माती भाजले गेल्याने पूर्णतः नुकसान झाले आहे. जवळपास एकरी 35 ते 40 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
अवघ्या दोन दिवसांवर केळी काढणीवर आली होती. मात्र, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडे ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने अमोल काळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकर पैकी दीड एकर केळीचे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली