LOKSANDESH NEWS
एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक
नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकाने चार वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली