आमदार किशोर पाटील यांच तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा
ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचा सत्कार केला. यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्ष मा. संजय गोहिल, माजी लोकनियुक्त जवखेडे सीम सरपंच दिनेश आमले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सायबर सेक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स चे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन हि संस्था २०१० सालापासून पाचोरा शहर व ग्रामीण भागात काम करत आहे. संस्थेने आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती गोकुळ सोनार यांनी दिली. महिलांना विविध उद्योग व्यवसाय प्रशिक्षण संस्था देत असते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर, पिक विमा योजना,माती पाणी परीक्षण, फार्मर्स क्लब तसेच शेतकरी अभ्यास दौरा असे विविध प्रकारचे ट्रेनिंग संस्था राबवित असते. सॅनिटरी नॅपकीन मॅन्युफॅक्चरींग युनिट या माध्यमातून महिलांना त्यांच्या मासिकपाळी च्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिन व इन्सुलेटर विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. वायफाय चौपाल योजने अंतर्गत गावोगावी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिटल लिट्रसी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना विविध सेवा सुविधा या गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे. ग्रामीण युवकांसाठी इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थे मार्फत स्किल इंडियाच्या अंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण, शिवणकाम, ब्युटीपार्लर असे विविध कोर्सेस राबविण्यात येत आहेत. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले, व संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांच्या धडपडीचे कौतुक करत त्यांच्या कामाचे अभिनंदन केले. सायबर सेक्युरिटी प्रशिक्षण खरंच खूप गरजेचे का आहे,
डिजीटल इंडिया च्या धर्तीवर देशाला महासत्ता बनविण्यासाठी डिजिटल शिक्षण आवश्यक आह। असे मार्गदर्शन किशोर पाटील यांनी केले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक संस्थेचे स्टाफ मेंबर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिष्णा बोरूडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर बाविस्कर, अश्विनी पाटील, तुळशीराम शेरमाळे, समर्थ मोगरे यांनी परिश्रम घेतले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली