LOKSANDESH NEWS
कोल्हापूर खंडपीठासाठी अधिवक्ता संघाची पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी आज पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली.
सोलापूर, सातारा, सांगली अशा तीन जिल्ह्यात मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे.
या निमित्ताने सरकारला सदबुद्धी देऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, असे साकडे अधिवक्ता संघाच्या वतीने विठ्ठलास घालण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली



