|LOKSANDESH NEWS
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत नवापूरमध्ये विश्व हिंदू परिषदेची निदर्शने
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. हाताला काळी फीत बांधून आणि “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देण्यात आल्या.
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला पर्यटकांवरील हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या हल्ल्यात 27 पेक्षा अधिक पर्यटक मृत्युमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत. केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली