एमडी खरेदी विक्री करणारे दोन इसम पोलिसांच्या ताब्यात
एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अजनी पोलीसांना यश आले आहे. नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम दुचाकीने एमडीची विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
रात्री च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून पाच ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. युगल नरखेडे आणि शेख जावेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पाच ग्रॅम एमडीसह दोन दुचाकी वाहन असा एकूण दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली