LOKSANDESH NEWS
ताडोबात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची दुसरी तुकडी दाखल
जटायू संवर्धन प्रकल्पाअंतर्गत, पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची दुसरी तुकडी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात सोडण्यात आली. हरियाणाहून आणलेल्या या पाच गिधाडांमध्ये तीन नर आणि दोन मादी आहेत.
महाराष्ट्र वन विभाग व बीएनएचएस यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात असून, गिधाडांची प्रकृती चांगली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली