LOKSANDESH NEWS
कोल्हापूरच्या अजीम अय्यास नदाफ विद्यार्थ्याला 99.60% मार्क मिळवले
दहावीची परीक्षा म्हणजे जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामध्ये बरेच जण आपले पूर्ण प्रयत्न करून चांगले मार्क मिळवत असतात. अशाच गुणवंत विद्यार्थ्यांपैकी कोल्हापुरातील एका विद्यार्थ्याला 99.60% मार्क मिळाले आहेत. कोल्हापूरच्या लाड चौक या परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थ्याचं नाव अजीम अय्यास नदाफ असे आहे.
घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे अजीमने कोणताही क्लास लावला नव्हता. तर घरी अभ्यास करताना देखील त्याने आपल्या भावाचं 96% मार्कांचा रेकॉर्ड मोडण्याचं चॅलेंज दिलं होतं. हे चॅलेंज मोडत त्याने त्याच्या न्यू हायस्कूल या त्याच्या शाळेचेही रेकॉर्ड मोडलं आहे. त्यामुळे अजीमवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.