चोपड्यात १२ लाख ७५ हजार चे बोगस कापसाचे बियाणे जप्त कृषी विभागाची कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपड्यात १२ लाख ७५ हजार चे बोगस कापसाचे बियाणे जप्त कृषी विभागाची कारवाई

LOKSANDESH  NEWS 



               चोपड्यात १२ लाख ७५ हजार चे बोगस कापसाचे बियाणे जप्त कृषी विभागाची कारवाई 

 चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक  या गावात शेतात महाराष्ट्र सह देशात बंदी असलेले कुठलेही परवाना नसलेले कापसाचे बियाणे असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील कृषी विभागाचे पथकाला मिळाल्याने त्यांनी तावसे बुद्रुक येथे जाऊन,  शेतात आंब्याच्या, पेरूच्या झाडांमध्ये लपवलेल्या अवस्थेत सतरा गोणी मध्ये ८५० पाकीट मिळून आले, त्याची किंमत बारा लाख ७५ हजार रुपये आहे. 

सदर कारवाईनंतर संपूर्ण बोगस बियाण्याचे पाकीट ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात बोगस बियाण्याची कारवाईची मोठी दुसरी कारवाई  असल्याने, चोपडा तालुक्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाई मध्ये नाशिकचे कृषी विभागाचे उदय ठाकरे जळगावचे विकास बोरसे व चोपडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण पाटील यांनी सहभाग घेतला.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली