धुळ्यातील मियावाकी प्रोजेक्टमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

धुळ्यातील मियावाकी प्रोजेक्टमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार

                                         धुळ्यातील मियावाकी प्रोजेक्टमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार


 धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरात विविध २५ ठिकाणी मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. त्यातील सर्वात मोठी मियावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती. मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मियावाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झाला आहे. 

मागील वर्षी धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत लाखो रुपये खर्च करून धुळे शहरांमध्ये वनविभागाकडून हजारो झाड घेऊन, मियावाकी गार्डन उभारणार होते. मात्र, या प्रोजेक्टसाठी लाखो रुपये खर्च करून विविध टेंडर काढण्यात आले होते. मात्र आज याच गार्डनची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, ८० टक्के गार्डन हे जळून गेले आहे. धुळे शहरात करण्यात आलेल्या २५ गार्डन पैकी दोनच गार्डन चांगल्या स्थितीत होते. मात्र त्यातील हे एक गार्डन पूर्णपणे जळून गेले आहे. असा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे या मियावाकी प्रोजेक्टमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधित ठेकेदारा विरोधात गुन्हे दाखल करा. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली