अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करणाऱ्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करणाऱ्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल


LOKSANDESH  NEWS 



 अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करणाऱ्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल 


अमरावती फ्रेजपुरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला परिसरात च राहणारा इसम त्रास देत होता , तिचा पाठलाग करून तिला मोबाईल नंबर मागत होता , माझ्या मागे येऊ नको नाहीतर पप्पाला नाव सांगेन असेही तिने त्याला ठणकाविले, मात्र जेव्हा पीडितेच्या वडिलांना मुलगी रडतांना दिसून आल्यावर तिला विचारणा केली असता सर्व प्रकार समोर आला, वडिलाने मुलीला सोबत घेऊन थेट पोलिसात त्या इसमा विरोधात तक्रार दाखल केली, हि घटना शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत २ मे च्या दुपारी घडली.

 एका शाळकरी अल्पवयीन पीडितेचा तिच्या परिसरात च राहणारा इसम काही दिवसापासून पाठलाग करीत होता, तिच्या घराच्या मार्गाने तर कधी तिच्या शाळेकडे येऊन तिच्याकडे बघत होता, पीडिता तिच्या मावशीच्या घराकडे जात असताना त्या इसमाने तिला आवाज देऊन थांबविले. तिला मोबाईल नंबर मागितला यावर माझ्या मागे येत नको जाऊ नाहीतर पप्पाना तुझे नाव सांगेन असे पीडितेने त्या इसमाला खडसावून सांगितले असता तो घटना स्थळ वरून निघून गेला.

 या दरम्यान अल्पवयीन पीडितेचे  वडील घराकडे येत असताना ती  रडत असताना दिसली, वडिलांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला सर्व  प्रकार सांगितला, या घटनेनंतर वडिलांनी  पीडितेला घेऊन थेट फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून जबानी रिपोर्ट दाखल केला, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करून सायंकाळी अखेर त्या इसमा विरुद्ध कलम ७५ , ७८ ( १ ) सहकलम १२ पॉक्सो अंतर्ग्रत गुन्हे दाखल केले, या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली