जळगावच्या एमडी ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांना अटक
जळगावच्या शाहूनगरमधील एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक करत एमडी ड्रग्स नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांचा समावेश आहे. याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळमधील घरातून २.३७ लाख रुपये किंमतीचे २३.७३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.
याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहूनगर येथून सर्फराज जावेद भिस्तीच्या घरातून ५.३४ लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जळगाव पोलिसांनी एमडी ड्रग्स नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली