ऑपरेशन सिंदूर नंतर धुळ्यात शिंदे सेनेचा जल्लोष
अतिशय बेधडकपणे भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात जात अतिरेक्यांची ९ ठिकाणे उध्वस्त केली. या कारवाईनंतर शिवसेनेतर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व्हिजेएनटी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला.
पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला पुर्ण झाल्याचे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले. हातात तिरंगा झेंडा घेवून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दमदमून गेला. राज्याच्या दौऱ्यावर असलेले किसवे हेही या आनंदोत्सवात सहभागी झाले. काश्मीर मधील पहलगाम घटनेचा बदला घेतला. आणि जगाला दाखवून दिले, की या पुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही. भारतीय सैन्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब किसवे यांनी यावेळी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली