तर.. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार- शिवसेना....
लोकसंदेश सांगली प्रतिनिधी
दिनांक: २८-०६-२०२५
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. अनेक पक्षांकडून आपापली मोर्चे बांधणी सुरू आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे.
आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीतील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली विधानसभा क्षेत्र व मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.निवडणुकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ताकतीने जास्तीत जास्त उमेदवार उभे करून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि भाजपाकडून जर शिवसेनेला नजरअंदाज केले गेल्यास अथवा योग्य तितक्या जागा न दिल्यास नाईलाजाने आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवावी लागली तर बेहत्तर, आम्ही ती ताकदीने आणि प्राणपणाने लढू असा विश्वास समस्त शिवसैनिकांनी बोलून दाखवलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही सर्वसामान्य,तळागाळातील, वाड्या वस्त्यावरील नागरिकांसह कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे तळागाळातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे यासाठी शिवसेना पर्यायाने पक्षाचे मुख्य नेते व या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. सर्व नेत्यांनी ताकतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती चे व शिवसेनेचे भगवे वादळ उठवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन संपर्क मंत्री देण्याचा निर्णय घेतला आहे या संपर्क मंत्र्यांच्या माध्यमातून गल्लीबोळातील मतदारांपर्यंत शिवसेना पर्यायाने उमेदवारांना पोहोचवण्याचे आणि त्यांना हवे ते बळ देण्याची भूमिका पार पाडली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेला आपली ध्येय धोरणे आणि आपला अजेंडा तसेच त्या त्या उमेदवाराचा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्यासाठीचा मार्ग सोपा आणि सुकर होणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सांगली शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकतीने कामाला लागण्याच्या, आपापल्या प्रभागांमध्ये पक्ष वाढीसाठी व महापालिका क्षेत्रामध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, स्थानिक प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत झालाच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक करून कामाला लागण्याची आवश्यकता आहे, सर्वसामान्य माणसाच्या मेंदूत आणि हृदयात शिवसेना आणि फक्त शिवसेनाच राहिली पाहिजे यासाठी तळमळीने डोळ्यात तेल घालून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिवस रात्र तळमळीने महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी काम करतात त्याचप्रमाणे प्रत्येकाने ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग जनहिताची कामे केली पाहिजेत आणि जनसामान्य जनतेच्या हृदयात शिवसेनेचे नाव कोरले पाहिजे असे मतही जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.
सदर बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेसाठी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत वरिष्ठ पातळीवर महायुती संदर्भात अथवा स्वबळाबाबतित जे काही आदेश येतील त्याचे तंतोतंत पालन करीत आम्ही आगामी सर्व निवडणुकीला सामोरे जाऊ असा विश्वास व्यक्त केला.
○ यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, संपर्कप्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे, महिला जिल्हा संघटिका रुक्मिणी ताई आंबिगीरे, बजरंग पाटील, हरिदास लेंगरे, महादेव गाडगीळ, महादेव सातपुते,समीर लालबेग, संदीप ताटे,किरण रजपूत, गजानन मोरे,बापूसाहेब देशमुख, शरद यमगर, सुनील साबळे,समाधान मोहिते, प्रताप पवार, नितीन काळे, सुगंधाताई माळी, मनीषा पाटील, पायल पाटील,श्रीयश गाडगीळ, वैभव कुलकर्णी, मतीन काझी, मोहसीन मुल्ला,सारंग पवार, धर्मेंद्र कोळी, स्वप्निल मस्कर,धनंजय पेंढारकर इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.