रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ट च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ट च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड...


रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ट च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड...


मुंबई, दि. २४ जून २०२५ — सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनागोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय, मुंबई येथे जाहीर पक्षप्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार मा. श्री. सुरेशभाऊ खाडे, जैन प्रकोष्ठाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. संदीप भंडारी, श्री.  प्रशांत गोंडाजे  यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा. बावनकुळे  यांनी श्री. रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.


 यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार श्री संदीप भंडारी यांनी श्री रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्टच्या च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्माननीय निवड केल्याचे जाहीर केले
आपल्या मनोगतात श्री. रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत  केलेल्या सामाजिक  कार्याला पक्षाचा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे हे कार्य अधिक जोमाने व समाजहितासाठीच करणार असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात मा. संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली.
या प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भुदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.