कर्मवीर पतसंस्था दिपस्तंभ २०२५ पुरस्काराने सन्मानित...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मवीर पतसंस्था दिपस्तंभ २०२५ पुरस्काराने सन्मानित...



लोकसंदेश न्यूज 

कर्मवीर पतसंस्था दिपस्तंभ २०२५ पुरस्काराने सन्मानित

सांगली: कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई यांचा पुणे विभागातून रु. १००० कोटी वरील संस्था ठेव गटाकरिता दिला जाणारा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२५ देवून सन्मानित करण्यात करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १२ ऑक्टोबर रोजी गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त व निबंधक मा. श्रीकृष्ण वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे व महाराष्ट्र आणि कर्ना' सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यास संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून सहकार क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व अधिकारी मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

या पुरस्काराच्या निकपामध्ये संस्थेचे अर्थकारण, वापरातील तंत्रज्ञान, समाजकारण, ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा, संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहकसेवा व समाजसेवा व्यवस्थापन सहकारासाठीचे योगदान या मापदंडावर आधारीत संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीने छाननी केल्यानंतर या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली. या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार, सेवक, यांच्या सांधिक कार्याचे असल्यामुळे या सर्वांनी आनंद व्यक्त केला.

संस्थेच्या ठेवी रु.१२०८ कोटी असून रु. १००१ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणुक रु. ३१८ कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी रु. १४८ कोटी आहे. सभासद संख्या ६९००० आहे. मार्च २०२५ अखेर संस्थेस २६ कोटी ६४ लाखाचा नफा झाला आहे.

यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉ. अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू ओ. के. चौगुले (नाना), वसंतराव धुळाप्पाण्णा नवले डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासो भाऊसो थोटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारणेसाठी संस्थेच्यावतीने अधिकारी श्री. संजय सासणे, श्री. सुकांत चौगुले व विभागीय अधिकारी श्री. अभिजीत खोत हे कार्यस्थळी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.