सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वसगडे येथील महारेल कॉर्पोरेशनने तयार केलेला पूल दुसरीकडे शिफ्ट करण्याचे केली मागणी..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वसगडे येथील महारेल कॉर्पोरेशनने तयार केलेला पूल दुसरीकडे शिफ्ट करण्याचे केली मागणी..

लोकसंदेश न्यूज 



सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वसगडे येथील महारेल कॉर्पोरेशनने तयार केलेला पूल दुसरीकडे शिफ्ट करणेसाठी मुख्यमंत्र्यांच्या कडे केली मागणी...

जनतेचा पैसा मातीत घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी व शासनाने अशी पुलाची बांधकामे करून व नागरिकांना "अकारण" सेवा देण्यापासून वंचित ठेवणाऱ्या या अधिकाऱ्यांना एक तरी बडतर्फ करा किंवा हा पूलच बाजूला हटवा ..अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे

आता असा अर्ज देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे..
प्रति

मा.नाम.देवेंदजी फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विषय :- सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वसगडे येथील महारेल कॉर्पोरेशनने तयार केलेला पूल दुसरीकडे शिफ्ट करणे बाबत

महोदय

महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन कंपनीने आमच्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडे येथे रेल्वे उड्डाणपूल बांधून तयार ठेवला आहे
सदर पूलाची त्या ठिकाणी गरज नसताना तयार करण्यात आला आहे असेच आता खेदाने म्हनावसे वाटते कारण सदर पूल तयार होऊन चार ते पाच महिने झाले आहेत मात्र सदर पूल अजून वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत नाही त्या ठिकाणी पर्यायी वाहतुकीसाठी चंद्रावर प्रवास केलेला अनुभव घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये असून आता त्या पुलाची गरज राहिलेले नाही तसेच आमच्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं सांगली जिल्हा प्रशासन व सत्ताधारी महायुतीतील आजी-माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांचे लेटर पॅड सुद्धा संपलेले आहे त्यांचा कॉम्प्युटर बंद पडला आहे तसेच दिवाळीचा फराळ करून त्यांचे तोंड सुद्धा बंद झालेले आहे त्यामुळे आम्हाला तुमच्याशी पत्र व्यवहार करायला लागत आहे
त्यामुळे जगातील अद्यावत टेक्नॉलॉजी उपलब्ध करून सदर पूल आमच्या इथून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात यावा
सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना भाऊबीजेची भेट देण्यात यावी
ही विनंती आहे

सतीश साखळकर उमेश देशमुख शंभूराज काटकर महेश खराडे गजानन साळुंखे आनंद देसाई

सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Chandrakant Patil
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली / District Information Office, Sangli
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. / Collector Office, Sangli.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराजस्व अभियान.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.