'लाच' विरोधी सप्ताहामध्ये. शपथ व परत लाच घेणे सुरूच
सांगली: यंदा २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान लाचलुचपत विभागाने 'दक्षता जनजागृती सप्ताह २०२५' चे आयोजन केले होते. परंतु सप्ताहापुरतीच जागृती असते. मात्र चिरीमिरीची सवय काही सुटत नाही असा अनुभव येतो.
अशा प्रकरणात लाचलुचपत कर प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास पडताळणी करून संबंधित लोकसेवकाविरुद्ध सापळा रचून कारवाई केली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एखाद्या लोकसेवकाने भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेबाबत चौकशी केली जाते. त्यासाठी तक्रारदाराने अधिकृत माहिती द्यावी लागते. तसेच शासकीय संपत्तीचा अपहार करणे किंवा फायद्यासाठी वापर केल्याच्या प्रकरणात देखील चौकशी होऊ शकते. लाचखोरांविरुद्ध कारवाईसाठी जागृती होण्यासाठी दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताह साजरा होतो. जागृतीचे स्टीकर, बॅनर लावले जातात. शपथ दिली जाते.
लाचविरोधी दक्षता जनजागृती सप्ताह
केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी देशात दक्षता जागरूकता सप्ताह साजरा होतो. यंदा २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर अखेर हा सप्ताह साजरा झाला.
लाच न घेण्याची शपथ घेतली आणि परत येरे माझ्या मागल्या...
दक्षता सप्ताहात विविध विभागात लाच न घेण्याची व देण्याची शपथ घेतली जाते. परंतु दक्षता सप्ताहापुरतेच अनेकजण हे नाटक करतात. नंतर लाचखोरी सुरूच असते.
वर्षभरात १३ लाचखोर सापडले जाळ्यात... आणि काही पाईपलाईन मध्ये...
विभाग
महसूल ६
पोलिस १
जि.प.१
मनपा १
समाजकल्याण १
कृषी १
खासगी १
म्हाडा १
_________________________________________________
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी तुमच्याकडे शासकीय कामासाठी लाच मागितली तर त्यांच्याविरोधात निर्भयपणे तक्रार करावी. तसेच त्यांच्यावतीने कोणी खासगी व्यक्तीने देखील लाच मागितली तरी तक्रार करता येते.
यास्मिन इनामदार, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली..
_________________________________________________
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.
लोकसंदेश मीडिया व इंडिया न्यूज पॉवर ऑफ मीडिया (पत्रकारांची संघटना) या दोन्ही संस्थांकडून आपणास आवाहन करण्यात येत आहे...
आपणास आपल्या कामासाठी सरकारी, सहकारी व इतर क्षेत्रात कोणी अधिकारी ,कर्मचारी ,लाच मागत असतील तर कृपया पुढील नंबर वर संपर्क करावा..
8830247886
9850155823

