जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली
दिनांक: २४/०३/२०२६
🔸 सांगली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घाबराट किंवा अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
🔸 इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडून नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा समाधानकारक आहे आणि वितरण व्यवस्थाही व्यवस्थित सुरू आहे.
🔸 नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करावी. कोणतीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
— जिल्हाधिकारी, सांगली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.


