महापालिका शाळा क्रमांक 1 च्या डिजिटल वर्गाचे लोकार्पण : महापौर आयुक्तांची उपस्थिती : डिजिटल क्लासरूमसाठी अँप्रोच हेलपिंग हॅन्ड फौंडेशनचा पुढाकार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महापालिका शाळा क्रमांक 1 च्या डिजिटल वर्गाचे लोकार्पण : महापौर आयुक्तांची उपस्थिती : डिजिटल क्लासरूमसाठी अँप्रोच हेलपिंग हॅन्ड फौंडेशनचा पुढाकार





महापालिका शाळा क्रमांक 1 च्या डिजिटल वर्गाचे लोकार्पण : महापौर आयुक्तांची उपस्थिती : डिजिटल क्लासरूमसाठी अँप्रोच हेलपिंग हॅन्ड फौंडेशनचा पुढाकार 

सांगली : अँप्रोच हेलपिंग हॅन्ड फौंडेशनच्या रुलर इनिशिटीव फॉर स्कुल एज्युकेशन या उपक्रमांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मधील तयार करण्यात आलेल्या अद्यावत डिजिटल क्लासरूमचे उदघाटन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले. 
   मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आणि अप्रोचकडून महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये अद्यावत डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आली आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च अप्रोचकफून करण्यात आला आहे. यामध्ये संगणक संच, डिजिटल क्लास बोर्ड, साऊंड सिस्टीम, बॅटरी बॅकअप, इंटरनेट सेवा यासह विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आधुनिक बेंच , प्रोजेक्टर असे साहित्य अप्रोचकडून पुरवण्यात आले आहे. आज अद्यावत डिजिटल क्लासरूमचे उदघाटन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, उपायुक्त चंद्रकांत आडके, प्रशासन अधिकारी पोपट मलगुंड , अप्रोचचे संचालक प्रसाद दीक्षित, नगरसेवक करण जामदार , नगरसेविका नसीमा शेख, मनपाचे अधिकारी नितीन शिंदे, परमेश्वर अलकुडे, वैभव वाघमारे, नकुल जकाते, ऋतुराज यादव , शिक्षक मंडळाचे गजानन बुचडे, सतीश कांबळे , तात्यासाहेब सौन्दते, पदमा घोलप , प्रभारी मुख्याध्यापिका मीना ऐतवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अप्रोचचे प्रसाद दीक्षित यांनी डिजिटल क्लास बोर्डचे प्रात्यक्षिक सर्वाना दाखवले. कार्यक्रमास अप्रोचचे डायरेक्टर राकेश सरोदे , करण संकपाळ, प्रसाद रजपूत, राजन मगदूम, मयूर शिंदे, विशाल देसाई, स्नेहल मोरे, किड्स परेडाईजचे भाटे मॅडम, अप्रोचबरोबर विजेता समुव्हाचे सर्व उद्योजक आणि शोषल शास्त्र टीम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरफराज शेख आदी उपस्थित होते.