सांगलीच्या पूर पट्ट्यात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती सुरू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीच्या पूर पट्ट्यात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती सुरू





सांगलीच्या पूर पट्ट्यात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती सुरू

सांगली : संभाव्य पावसाळा लक्षात घेता सांगली मिरजेच्या पूर पट्ट्यात अग्निशमन विभागाकडून सुरक्षा उपाययोजनाबाबत नागरिकांसाठी प्रबोधन आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमकडून प्रबोधन सुरू करण्यात आले आहे. 
    संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पूर परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. मिरज कृष्णा घाट परिसरात नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांची माहिती आणि आपत्ती काळात आपला आणि दुसऱ्याचाही बचाव कसा करावा याचे प्रशिक्षणही देण्यात आले. आज सांगलीत गणपती मंदिरासमोर अग्निशमन विभागाने पूर पट्ट्यातील नागरिकांसाठी प्रबोधन मोहीम घेतली. यावेळी आपत्ती काळात घ्यावयाच्या दक्षता याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, स्थानिक नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर आणि अग्निशमन जवान उपस्थित होते. पुढील आठ दिवस पूर भागात आशा पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली जातील असे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.