सातारा, महाबळेश्वर ~प्रतापगड घाट रस्त्यावर एकजण दरीत कोसळला... माकडासाठी खाद्य देताना पाय घसरल्याने तो दरीत 100 फूट दरीत कोसळला..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा, महाबळेश्वर ~प्रतापगड घाट रस्त्यावर एकजण दरीत कोसळला... माकडासाठी खाद्य देताना पाय घसरल्याने तो दरीत 100 फूट दरीत कोसळला..

सातारा, महाबळेश्वर ~प्रतापगड घाट रस्त्यावर एकजण दरीत कोसळला... माकडासाठी खाद्य देताना पाय घसरल्याने तो दरीत 100 फूट दरीत कोसळला.. 



SATARA
महाबळेश्वर लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी


महाबळेश्वर ट्रेकरच्या जवानांनी त्यास बाहेर काढण्यात यश मिळाले आहे


महाबळेश्वर ~प्रतापगड मुख्य घाट रस्त्यावर खोल दरीत कोसळलेल्या संदीप ओमकार नेहते ( वय वर्ष 33)  सध्या रा. बावधन पुणे,या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकरच्या जवानाना तीन तासाच्या अथक प्रयत्नाने दरीतून काढले, जखमी नेहते माकडाला चिप्स खायला देण्यासाठी गाडीतून उतरले असता हा प्रकार घडला... कठड्यावर उभे राहून संदीप नेहते हे माकडाला चिप्स देत होते, काही कळायच्या आतच ते शंभर फूट खाली दरीत कोसळले.. 


ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता च्या सुमारास घडली याबाबत
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप व त्यांचे कुटुंबीय हरिहरेश्वर येथून महाबळेश्वर येथे पर्यटनास येथील आंबेनळी घाट रस्त्या मार्गे येत असता त्यांना जननी-माता मंदिरावरील बाजूच्या रस्त्याने जात असलेल्या कठड्यावर काही माकडे दिसली, संदीप गाडीतून उतरून या माकडांना चिप्स खायला देण्यासाठी दरीत वर असलेल्या कड्यावर उभे राहिले ,त्यांचा पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळले याबाबतची माहिती महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकचे जवानांना समजतात तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. सतंतधार पावसात तीन तासाच्या प्रयत्नानंतर महाबळेश्वर ट्रेकरच्या जवानांनी त्याना सुखरूप बाहेर काढले येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले


 महाबळेश्वर पोलिसांच्या कडून सर्व पर्यटकांना असे आवाहन करण्यात येत आहे की,

सध्या पावसाचे दिवस आहेत रस्त्याकडेला,दरीकडेला, डोंगरावरून दगड माती, आल्यामुळे त्या रस्त्याकडेला तसेच कटड्यावर चढून खाली पाहणे,किंवा माकडांना काही खाण्यास देणे, ग्रुपमध्ये चेष्टा-मस्करी कडून ढकलाढकली करणे, हे सर्व आपल्या जीवावर बेतण्यासारखे आहे.. 


तरी यासाठी पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवून निसर्गाचा आनंद घ्यावा.. असा इशारा महाबळेश्वर पोलिस देत आहेत..

या मोहिमेत महाबळेश्वर ट्रॅकरचे सुनील भाटीया, माजी नगरसेवक कुमार शिंदे, संतोष शिंदे, सतीश ओंबळे, अमित कोळी, जयवंत बिरामणे, सुनील केळगणे, बाळासाहेब शिंदे ,सौरभ साळेकर अमित झाडे ,सौरभ गोळे ,अनिकेत वाघदरे ,सूर्यकांत शिंदे ,यांच्यासह महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार , डी.एच.पावरा, संदीप मांढरे, सलीम सय्यद, जगताप आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई