बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे सक्षम शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना सौ भारती चंगेडिया, यावेळी व्यासपीठावर अभिजीत पाटील मुख्याध्यापक एस एस पाटील आदी..
लोकसंदेश वार्ताहर : विनोद शिंगे
"लाँकडाऊनमुळे मुलांच्या बौद्धिक प्रगतीला ब्रेक लागला आहे. आपण आठ वर्षे बौद्धीकदृष्ट्या मागे गेलो आहोत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. शालेय व कॉलेज जीवनात विभिन्न लिंगाबाबत आकर्षण वाटणे हे साहजिक आहे, पण त्यामध्ये आपण वाहून जाऊ नये"
असे प्रतिपादन भारतीय महिला दक्षता कमिटीच्या इचलकंजी येथील सदस्या सौ भारती चंगेडिया यांनी केले. बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे किशोरवयीन मुलांसाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून" सक्षम शाळा सुदृढ शाळा "हा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे
ए. पी. आय अभिजीत पाटील व श्रीमती निर्मला मोरे, श्रीमती रूपाली शिंदे, गजानन शिरगावे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बममणावर, शशिकांत डोणे, वैशाली नर्मदे व पर्यवेक्षक एम बी पाटील यांची यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिजीत पाटील म्हणाले" विद्यार्थ्याने सोशल मीडियातील गैरवापर यापासून अलिप्त राहावे. ऑनलाइन फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. युवकांनी आई-वडिलांनी ज्या हेतूने आपल्याला शाळेमध्ये पाठवला आहे. ती जबाबदारी लक्षात घेऊन पूर्ण ताकदीने अध्ययनात लक्ष घालावे. शालेय शिस्त यांची काटकोरपणे पालन करावे."
यावेळी पी एस आय हिना शेख यांनी विद्यार्थिनीनी जीवनात कोणती दक्षता बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक एस एस पाटील, पर्यवेक्षक एम बी पाटील अध्यापिका जे सी पाटील, एस बी मसुटे व जितेंद्र आणुजे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सौ. ए. एस हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. सूरज पाटील यांनी आभार मानले.
Loksandesh news media Private limited mumbai