दहावीनंतर काय करावे... बऱ्याच विद्यार्थी व पालकांना दहावी नंतर काय करावे? आपल्या करियर साठी आपल्या परिस्थितीनुरूप कोणत्या शैक्षणिक अभ्यासक्रम निवडावा याबाबतीत विद्यार्थी भांबावलेला असतो त्यांच्या माहितीसाठी हा लेखप्रपंच.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दहावीनंतर काय करावे... बऱ्याच विद्यार्थी व पालकांना दहावी नंतर काय करावे? आपल्या करियर साठी आपल्या परिस्थितीनुरूप कोणत्या शैक्षणिक अभ्यासक्रम निवडावा याबाबतीत विद्यार्थी भांबावलेला असतो त्यांच्या माहितीसाठी हा लेखप्रपंच.....


दहावीनंतर चा नंतरची वेळ ही आपल्या करिअरचा, व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. आजही आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच पुढे काय याची दिशा काही प्रमाणात ठरलेली असते. अनेकदा अपेक्षेपेक्षा अधिक तर बहुतेकवेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात अन् ठरलेल्या फॅकल्टीपेक्षा वेगळा मार्ग निवडायचा का असे प्रश्न उभे राहतात. काहीवेळा आधी निकाल लागू दे मग बघू अशीही मानसिकता असते. अशा सर्वच संभ्रमात असणा-यांना काहीसे मार्गदर्शक ठरेल याकरिताच दहावीनंतर पुढे काय याचा घेतलेला आढावा.

साधारणपणे दहावीचे निकाल लागले की आता पुढे काय असा प्रश्न येतोच.. कारण इतकेच की, स्पर्धेच्या जगात, व्यावसायिक, करिअरच्या प्रांगणात आपले पाऊल पडणार असते, हे पाऊल टाकताना आपली आवड-निवड अन् आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती याचा विचार होणे अपेक्षित आहे. दहावीनंतर कला, शास्त्र अन् वाणिज्य या मुख्य फॅकल्टीशिवाय चाकोरीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम राहतो. त्यात आयटीआय, कौशल्यवृद्धी करणारे तंत्रज्ञान अभ्यासक्रम आदींबाबतची माहितीही हवीच.

बहुपर्यायी वाणिज्य शाखा
वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता उत्तम वातावरण आहे.

सायन्स शाखेतील आधुनिक संधी
सायन्स शाखेची निवड आजही पारंपरिक मेडिकलकरिताच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. १२ वी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात.  १२ वी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. संगणक पदवी शिक्षणात सध्या अनेक विधिध संधी उपलब्ध आहेत.

कला शाखेतील सुवर्णसंधी

कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय १२ वीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो, विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर आहेच.

कला शाखा
गत काही वर्षात अडगळीत पडते की काय अशी वाटणारी कला शाखा गत दोन वर्षात पुन्हा तेजीत आहे. या शाखेत जाणा-यांकरीता मात्र आधी आपण काय करायचे ते निश्चित करुनच जावे. कला शाखेत प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांना अगदी अकरावीपासूनच आपल्या कला गुणांना वावा देण्याची संधी मिळते, मग गॅदरींग, साहित्य मंडळ, निवडणूका, नाटय स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक पातळीवर आपण आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून देऊ शकतो.

अनेक पर्याय यांची संधीदहावीनंतर शास्त्र शाखेला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना एक चांगला पर्याय असतो, तो म्हणजे १२ वीत जरी तुलनेने कमी मार्कस पडले तरी त्यांना पुढील शिक्षणाकरिता कॉमर्स वा कला शाखेची निवड करता येते. कला शाखेतून भूगोल या विषयात पदवी घेतली तर विद्यार्थ्यांना एमएससीला प्रवेश घेता येतो. कॉमर्स शाखेतून करिअरच्या अनेक संधी मिळवता येतात. अशी संधी इतर शाखेत प्रवेश घेतल्यांनतर मिळत नाही.

पोलीस भरती, सैन्य दलातील भरती
१० आणि १२ वीनंतर विद्यार्थ्यांना पोलीस दलातील हवालदार या पदाकरिता भरती होता येते. याकरिता शारीरिक चाचणी परीक्षा, तोंडी अन् लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते. तर सैन्यदलातील अनेक पदांकरिताही विद्यार्थी १०, १२ वीच्या मार्कावर अर्ज करू शकतात. १२ वीनंतर सैन्यदलातील र्मचट नेव्ही, एअर फोर्स असे पर्याय निवडता येतात. म्हणजेच पुढील शिक्षण अन् करिअर असे पर्याय आहेत.


काही धोके

दहावीनंतर डॉक्टर वा इंजिनीयर होण्याची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी शक्यतो सायन्सला अ‍ॅडमिशन घेतात. पण ११,१२ वीच्या वर्गात सायन्सचे विषय अनुक्रमे, भौतिक, रसायन शास्त्र अन् गणित या ग्रुपमध्ये त्यांची गुणोत्तर टक्केवारी काहीशी खालावते, तसेच सीईटी अन् नीट परीक्षेतही गुणांकन खालावते, साहजिकच १२ वीच्या मार्कावर परिणाम होतो अन् अपेक्षित ट्रॅकला प्रवेश मिळत नाही, अशावेळी मग मुले १० वीच्या मार्कावर डिप्लोमाला प्रवेश अर्ज भरतात, या सर्वामध्ये दोन वर्षे वाया जातात, काहीवेळा विद्यार्थी ठरलेला ट्रॅक सोडून कॉमर्स वा कला शाखेकडे वळतात, मात्र मुळातच ही त्यांची आवड नसल्याने ते या शिक्षणात रमू शकत नाहीत, त्यामुळे या निर्णयाचा फटका आयुष्यातल्या गंभीर घटनांत बदलणारा ठरतो. त्यामुळे एकतर आपल्याला काय अन् कितपत झेपेल याचा विचार करूनच विद्यार्थी आणि पालकांनी साईट निवडावी. समजा अपयश वा कमी मार्कस पडले तर कोणता पर्याय निवडायचा ते आधीच ठरवावे, याबाबतीत आपल्या आजूबाजूच्या शिक्षित लोकांशी चर्चा व सल्लामसलत करावी म्हणजे नैराश्य येणार नाही.लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई