सांगली :--जादूटोणा विरोधी कायदा हा देवा धर्माच्या विरोधात नसून! देवाधर्माच्या नावावर शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. एक चांगला सुसंस्कृत समाज निर्माण करण्याकरिता या कायद्याची आवश्यकता आहे. प्रशासन, संस्था संघटना व जनतेच्या समन्वयातून जाणीव जागृती उपक्रम राबवूया असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयंत चाचरकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चेदरम्यान जादूटोणाविरोधी कायद्याच्या संदर्भात जिल्हाव्यापी जाणीव जागृती उपक्रमा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी माहिती पुस्तकेचे वितरण करण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक शाहीन शेख, रणजीत माने, मुन्ना उर्फ (चांद) शेख. ए. एम. सुतार. आदींनी केले..