अणसुरे ग्रामपंचायतीचा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केला सन्मान...*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अणसुरे ग्रामपंचायतीचा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केला सन्मान...*


*रत्नागिरी*

🔴 *'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत कोकण विभागमध्ये प्रथम क्रमांक*

                 लोकोउपयोगी उपक्रमांसह पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने लक्षवेधी उपक्रम राबवणा-या अणसुरे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत कोकण विभागमध्ये प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी अणसुरे ग्रामपंचायतीचा सन्मान केला असून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक व ग्रामस्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

           या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार डॉ.राजन साळवी यांनी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत आपल्या ग्रामपंचायतीला गौरविण्यात आल्याने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात परस्पर उत्तम समन्वय आल्याचे स्पष्ट होत असुन आपण सर्वांनी मिळून मेहतीने व विशेष म्हणजे प्रामाणिकपणे स्वच्छतेप्रती व पर्यावणाप्रती केलेल्या कामाची पोच पावती म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला लाभलेला उच्चरुपी सन्मान असल्याचे म्हटले. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उप तालुकाप्रमुख राजन कुवळेकर, उप जिल्ह महिला आघाडी दुर्वा तावडे, विभागप्रमुख कमलाकर कदम, सुतार सर, माजी सभापती अभिजित तेली, विभागप्रमुख गणेश तावडे, नरेश दुधवडकर, माजी सभापती सुभाष गुरव, प्रभारी गट विकास अधिकारी पंडित, माजी जि. प. सदस्य मंदाताई शिवलकर, उप विभागप्रमुख राजन कोंडेकर, नंदू मिरगुळे, महिला विभाग संघटक शैलजा मांजरेकर, सरपंच श्री रामचंद्र कणेरी, सदस्य प्रविण गावकर, उल्हास आंबोळकर, नेत्रा सावंत, समीक्षा कणेरी, ग्रामसेवक राजेंद्र प्रसाद राऊत, संचिता पंगेरकर, दिवाकर गावकर, तुलसीदास जोशी, हर्षद तुळपुळे, माजी सरपंच शीतल पंगेरकर उपस्थित होते.