आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्नशील - केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्नशील - केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश





सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जगभरात वापरले जाणारे मॅनमेड फायबर टेक्नीकल टेक्सटाईल आणि कॉटन इंडस्ट्रीसाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला खूप काही करावयाचे असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी केले.
माधवनगर रोड वरील डी.बी हाऊस येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश बोलत होत्या. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, निता केळकर आदि उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, आज मी सांगलीमध्ये जीवन इकोटेक्सटाईलचे उत्पादन पाहिले त्यामध्ये नॉन वोव्हन, ईको फ्रेंडली स्वरूपाची व पुनर्वापर उत्पादन करण्यासाठीच्या उत्पादनांचा समावेश आहे. डोंगरी व पर्वती भागांमध्येही जीओ टेक्टटाईलने नि‍र्मिती केलेल्या या उत्पादनांचा वापर होत आहे. आपण अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले असून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिले आहे. अद्यापही आपल्याला खूप काही करावयाचे आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठी याबद्दलचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक योजना सरकारच्या विचाराधीन आहेत. सांगलीतील या उत्पादनांना पाहून मनस्वी आनंद झाला असून ही उत्पादने अत्यंत चांगल्या दर्जाची आहेत, असे त्या म्हणाल्या.
पूर्वी आपल्याकडे कॉटनबेस्ड उत्पादनाची निर्मिती होत होती. इचलकरंजीलाही जावून आल्याचे सांगून केंद्रीय रेल्वे तथा वस्त्र राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, इचलकरंजीच्या ठिकाणी जागतिक स्तरावर गुणवत्तापूर्ण ठरणारी वस्त्रोद्योगामधील उत्पादने घेतली जात आहेत. कच्च्या मालाबरोबरच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम तंत्रज्ञान ते वापरत आहेत. त्यांच्यासाठीही योजना आपण बनविली असून यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानात त्यांना अद्ययावत करण्यासाठी योजना बनविण्यात आल्या आहेत. गेली दोन वर्षे कोविडमध्ये अनेक उद्योगांना फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज असल्याची त्या यावेळी म्हणाल्या.
0000000