तीन विमानं सज्ज, सूरतहून निघणार, शिंदेंसह बंडखोर आमदार एअरलिफ्ट होऊन कुठे जाणार?

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तीन विमानं सज्ज, सूरतहून निघणार, शिंदेंसह बंडखोर आमदार एअरलिफ्ट होऊन कुठे जाणार?

तीन विमानं सज्ज, सूरतहून निघणार, शिंदेंसह बंडखोर आमदार एअरलिफ्ट होऊन कुठे जाणार?


मुंबई.ते सुरत ते आता आसाम गुवाहाटी....

एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे. या सर्वांना तीन बसने विमानतळावर नेण्यात येईल. तिथे तीन विमानं सज्ज आहेत. या विमानांनी सर्व जण आसामला गुवाहाटी दाखल होतील.


हायलाइट्स:
एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार
सुरतहून आसाममधील गुवाहाटीला रवाना होणार...
रात्रीच्या अंधारात बंडखोरांचं एअरलिफ्ट होणार.....

शिवसेनेचे बंडखोर आमदार गुजरातहून आसामला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. स्पाईसजेच्या तीन विमानांनी त्यांना गुवाहाटीला नेले जाणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे बंडखोर आमदार सुरत शहरातील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र बंड फसू नये, यासाठी शिंदेंसह सर्व बंडखोर आसामला रवाना होणार असल्याची माहिती आहे.


एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे. या सर्वांना तीन बसने विमानतळावर नेण्यात येईल. तिथे तीन विमानं सज्ज आहेत. या विमानांनी सर्व जण आसामला दाखल होतील. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ३५ हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. नुकतंच शिंदेंनी पळवून नेलेला आमदार हातावर तुरी देऊन त्यांच्या ताब्यातून निसटल्याचं समोर आलं. त्यामुळे अशाप्रकारे आणखी आमदार निसटून बंड फसू नये, यासाठी मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आमदारांना नेण्याचा घाट शिंदेंनी घातला आहे.

लोकसंदेश न्यूज मिडिया प्रा.लि.मुंबई