परस्पर सेवा सोसायटी कुंभोज यांच्यावतीने मयत सभासद वारसास दोन लाखाचा अपघाती मदत धनादेश सुपूर्त

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

परस्पर सेवा सोसायटी कुंभोज यांच्यावतीने मयत सभासद वारसास दोन लाखाचा अपघाती मदत धनादेश सुपूर्त


परस्पर सेवा सोसायटी कुंभोज यांच्यावतीने मयत सभासद वारसास दोन लाखाचा अपघाती मदत धनादेश सुपूर्त


कुंभोज लोकसंदेश वार्ताहर ,;विनोद शिंगे

कुंभोज तालुका हातकणंगले येथील परस्पर सहाय्यक सेवा सोसायटीचे सभासद वजीर मोहम्मद मुजावर यांचे अपघाती दुःखद निधन झाले होते. सदर संस्थेने सभासदांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स विमा दोन लाख रुपयांचा उतरला होता. परिणामी आज संस्थेच्या वतीने सदर सभासदाच्या वारसास विमा कंपनीचा अपघाती मंजूर असणारा दोन लाखाचा धनादेशाचा चेक वजीर मुजावर यांचे वारस मेहरलाल मुजावर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी संस्थेच्या सर्व कर्जदार सभासदांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सभासद विमा उतरण्यात आला असून ज्या सभासदांनी अद्याप विमा उतरलेला नाही त्यांनी त्वरित उतरून घ्यावा असे आव्हान वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी सादर मयताच्या वारसास परस्पर सेवा सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या वतीने वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या वतीने चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी अरुण पाटील, अनिल पाटील,संस्थेचे चेअरमन जंबु भोकरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब जमणे तानाजी मिसाळ, धनपाल कळंत्रे,सुनिता वाईकर, प्रदीप चौगुले,महावीर पाटील,धनपाल चौगुले, बाबुराव पाटील गुंडा रकरके, अनिल कोरे,सचिव राजु कुरणे तसेच सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा.लि. मुंबई