मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणार्या बीजेपी प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी येथील समस्त मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. यावर झालेल्या चर्चेत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतचे आश्वासन श्री. बलकवडे यांनी शिष्टमंडळास दिले.
निवेदनात, इचलकरंजी शहरात समस्त हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने राहतो. काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी जाणूनबुजून जाती-धर्मात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीची व खोटी माहिती देत अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. आक्षेपार्ह वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्यासह देशाच्या एकात्मतेला बाधा निर्माण झाली. या अवमानकारक वक्तव्याचा मुस्लिम समाजातून निषेध नोंदवला गेला. इचलकरंजी शहरातील सामाजिक एकोपा अबाधित व अखंडीत राहावा म्हणून मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी इचलकरंजीतील समस्त मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी अहमद मुजावर, कैश बागवान, पापा मुजावर, आबू पानारी, फरीद मुजावर, मुसा सनदी, सलीम अत्तार, अकबर मोमीन, कयूम खान, बाळासो मुजावर, मुसा खलीफा, आयुब सय्यद, सलीम शिरगांवे, आकाशा मुल्ला, समीर शेख, रफिक मुजावर, इम्रान हावेरी, उमर मुल्ला, मेहबूब पठाण आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई