पंजाब राज्यात दरोडा टाकून कोटीची लूट. आरोपीं कोल्हापूर पोलिसांनीच्या ताब्यात ---

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंजाब राज्यात दरोडा टाकून कोटीची लूट. आरोपीं कोल्हापूर पोलिसांनीच्या ताब्यात ---

पंजाब राज्यात दरोडा टाकून कोटीची लूट. आरोपीं कोल्हापूर पोलिसांनीच्या ताब्यात


कोल्हापूर : पंजाबमधील जागा खरेदी-विक्री करणाऱ्या कार्यालयात दरोडा टाकून एक कोटीची लूट करून पळून जाणाऱ्या चार आरोपींना रविवारी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले.


पंजाब राज्यातील डेराबासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागा खरेदी-विक्री व्यवसायाच्या कार्यालयावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात कार्यालयातील एक कोटीची रक्कम लुटण्यात आली होती. तसेच तेथील एका व्यक्तीला गोळ्या झाडून जखमी करण्यात आले होते. याबाबत तेथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.


या गुन्ह्यातील चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाने कोल्हापूरच्या दिशेने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, कागलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांनी तपास केला.


हे आरोपी गोव्याकडे जात असताना त्यांना आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोखण्यात आले. मोटारीतील अभय प्रदीप सिंग (वय २०), आर्य नरेश जगला (वय २०), महिपल बलगीत जगरण (व३९) व सनी कृष्ण जगलान (वय १९, सर्व जिल्हा रा. पाणीपत) यांना पकडण्यात आले. पंजाब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जसकमल शेख यांच्या पथकाकडे त्यांना सोपवण्यात आले.


ही कामगिरी यशस्वी केल्याबद्दल तपास पथकातील अंमलदार सहाय्यक फौजदार बिरप्पा कोचरगी), राजेश आंबुलकर, निरंजन जाधव व अमोल पाटील यांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.