सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पुन्हा गाडगीळ पॅनलची सत्ता..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पुन्हा गाडगीळ पॅनलची सत्ता..



सांगली लोकसंदेश प्रतिनिधी.
SANGLI

सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पुन्हा गाडगीळ पॅनलची सत्ता..



सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय: पुजारी पॅनेलचा धुव्वा... सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू.. अध्यक्ष:गणेश गाडगीळ

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील स्व. आण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला. 

विद्यमान अध्यक्ष गाडगीळ यांच्यासह १६ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. तर विरोधी पुजारी पॅनेलचा अक्षरश: धुव्वा उडाला. तब्बल सात ते साडेसात हजार मतांनी विरोधी सांगली बँक बचाओ पॅनेलच्या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला.


या विजयानंतर सत्ताधारी गाडगिळ गटाच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी ,करत विजयोत्सव करण्यात आला. 


यापैकी सत्ताधारी पॅनेलचे डॉ. रविंद्र आरळी यांची यापूर्वीच बिनविरोध झाली होती दरम्यान, . उर्वरित १६ जागांसाठी  निवडणूक प्रक्रिया रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती.


केवळ २१.५४ टक्के मतदान झाले ६० हजार ३३ मतदारांपैकी केवळ १२ १९२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी मिरजेतील मार्केट येथील शेतकरी भवनात मतमोजणी झाली सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी पार पडला


सांगली अर्बन मधे पुन्हा 'गाडगीळ'
.....

सत्ताधारी पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी

सर्वसाधारण गट ) - गणेशराव गाडगीळ ( ९८१३). अनंत मानवी (९५५१), हणमंतराव पाटील ( ९६५२), डॉ. रवींद्र आरळी (बिनविरोध), श्रीपाद खरे (९४२६), रणजित चव्हाण (९६५४), सतिष मालू (९६०४), संजय धामणगावकर (९५४५), रघुनाथ कालिदास (९५३७) शैलेद्र तेलंग (९५१३), संजय पाटील (९५२६) जिल्ह्याबाहेरील गट श्रीकांत देशपांडे (१०१३९). महिला राखीव करंदीकर ९३७५), अश्विनी आठवले (९१६७) अनुसुचित जाती, जमाती- मनोज कोरडे (१०१२८) भटक्या जाती, जमाती रविंद्र माकरे (१००८५). इतर मागास प्रवर्ग- सागर घोंगडे (१०१९४).

फेऱ्यात सत्ताधारी गाडगीळ पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ती तिसऱ्या फेरीपर्यंत कायम राहिली. सांगली, माधवनगर मतदान केंद्रावरील मते पहिल्या फेरीत मोजण्यात आली. या फेरीत तब्बल ३ हजारांचे मताधिक्य स्व. गोडबोले पॅनेलच्या उमेदवारांना होते. पुढील दोन फेऱ्यात झाली. दुपारी सव्वातीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहिर केला. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली..


 आमदार सुधीर गाडगीळ यांच्या
 कार्यालयासमोर जल्लोष केला. बँकेचे विद्यमान अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, आमदार गाडगीळ, जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढत विजयोत्सव साजरा केला.

विरोधी बापूसाहेब पुजारी पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी...

प्रमोद पुजारी (२५२९), अनिलभाऊ कुलकर्णी (२४८९), नानासाहेब शिंदे (२३३५), मिलिंद बोडके. २३४८). शिवाजी मोरे (२३९५), प्रेमचंद पांड्याजी ( २२९८), शीतल पाटोळे (२३४८). अतुल राजोपाध्ये (२२८१), अनिल मोहिते (२२९७), जिल्ह्याबाहेरील गट- ॲड. रवी अडकिणे (२४२२). अपक्ष शंकर कुलकर्णी (१०८), महिला राखीव- गौरी तांदळे (१९९५), ज्योती घोरपडे २३८१). अनुसुचित जाती, जमाती अरविंद कोरडे (२५६७). भटक्या जाती, जमाती- रमेश भाकरे (२५८८). इतर मागास एन. आय. काळे (२३६६). अपक्ष-संदीप गवळी (१६९).

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली