प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत आपल पुरोगामी समविचारी पॅनलला विजयी करा : जयवंत पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत आपल पुरोगामी समविचारी पॅनलला विजयी करा : जयवंत पाटील

प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत आपल पुरोगामी समविचारी पॅनलला विजयी करा जयवंत पाटील


कोल्हापूर लोकसंदेश वार्ताहर ; विनोद शिंगे

गेली सात वर्षे प्रसाद पाटील यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर येथे विरोधी संचालक म्हणून आपली सक्षम भूमिका प्रामाणिकपणे बजावत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवलेने बँकेची प्रगती होऊन सभासदांना लाखो रुपयांचा लाभ मिळत आहे. सन 2015 पूर्वी सक्षम विरोधकांना सक्षमपणे विरोधी भूमिका बजावलेले त्या काळात बँकेची प्रगती तर दिसली नाही उलट तोट्यात जाऊन सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, याउलट एप्रिल 2015 पासून प्रसाद पाटील यांचा अभ्यास व कणखर नेतृत्व आणि ठामपणे भूमिका मानल्याने बँकेच्या गैर खर्चाला आळा बसून बँक सरासरी 2.5 कोटी नफ्यात आली आहे .त्यासाठी प्राथमिक शिक्षक बँक लिमिटेड कोल्हापूर येथे आपल्या पुरोगामी समविचारी पॅनेलला बहुमताने विजयी करा असे आव्हान उमेदवार जयंवत पाटील यांनी केले .
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे आपलं पुरोगामी सम समविचारी पँनेलच्या प्रचारादरम्यान कुभोज येथे सभासदांच्या गाठीभेटी प्रसंगी बोलत होते. सहा हजार पेक्षा पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर ची पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 27 सालाकरता जाहीर झाली आहे. सदर निवडणुकीचे मतदान तीन जुलै रोजी होणार असून त्यासाठी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपलं पुरोगामी समविचारी पॅनेल निवडणूक लढवत आहे. सदर पॅनेलला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून पँनेलचे सर्व उमेदवार आपण सर्वसामान्य सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ते प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत परिणामी त्यांना प्रतिसादही चांगला लाभत आहे.
        यावेळी पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपलं पुरोगामी समविचारी पँनेलला विजयी करण्याचे आवाहन केले. सदर पँनेलचे चिन्ह छत्री असून पॅनेलचे 17 उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत बिंदिया कांबळे, सुनिल पवार, नंदकुमार आडके, सुभाष गुरव ,गणेश कोळी, आक्काताई रेंदाळे, सौ कांबळे मॅडम सौ नलवडे मॅडम तसेच मतदार उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई