जिल्हा सांगली तालुका मिरज येथील कुपवाडला रंगला श्वानाचा नामकरण सोहळा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जिल्हा सांगली तालुका मिरज येथील कुपवाडला रंगला श्वानाचा नामकरण सोहळा...




सांगली; लोकसंदेश प्रतिनिधी अभिजीत शिंदे.     

असं म्हणतात की हौसेला मोल नसत... तसंच भूत दयेपोटी माणसे वाटेल ते करायला तयार होतात... असाच एक प्रकार सांगलीतील कुपवाड मध्ये साजरा झाला... औचित्य होत स्वानाच्या नामकरणाच... प्राणी पक्षी प्रेमाचा अनोखा आविष्कार त्यानिमित्ताने पाहण्यात आला
 कुपवाड राजारामबापू हौसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या प्राणी प्रिय जमुना पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी लॅोब्रोडार जातीच्या कुत्र्याच्या पिल्ल्याच चक्क बारसे घातले .. व त्याचा नामकरण समारंभ थाटामाटात पार पाडला 


स्वतः त्यांनी आपल्या प्राणी प्रेमापोटी बरीच बेवारस कुत्री, मांजर, व  ईतर प्राण्यांना जीवदान देऊन त्यांचं संरक्षण केलेलं आहे "प्राणीमात्रांवर दया करा "त्यांना  मायेची वागणूक द्या" .. या संकल्पनेतून त्यांनी आपल्या जवळ असणाऱ्या सर्व प्राण्यांना कुत्रे मांजरांना इतर प्राण्यांना पदरमोड खर्च करून जोपासना केली आहे दर वर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त त्या या परिसरातील सर्व प्राण्यांना,कुत्र्यांना गोडधोड जेवण घालत असतात .. स्वतः व्यवसायाने ब्युटी पार्लर चालक असलेल्या जमुना पाटील संपूर्ण कुटुंबा सह हा छंद जोपासला आहे  या मधे यांनी नवजात श्वानाचे चक्क "बेला'' नामकरण  सोहळा एक आगळा-वेगळा संदेश समाजाला दिला आहे, यानिमित्त रंगलेला या अनोख्या कार्यक्रमात सर्व आप्त मित्र, स्नेही व नातेवाईकांना बोलावून त्यांना 
आमंत्रित करून या कुत्र्याच्या पिल्ल्याचे "बेला' नावाने नामकरण समारंभ पार पाडला 


..यामध्ये पाहुण्यांच्या मिष्ठान्न पंगती तर रंगल्याच पाहुण्याना आहेर पण केला त्यामुळे या कार्यक्रमात एक वेगळी रंगत आली होती ..


.या कार्यक्रमासाठी आपल्या घरात आपल्या एखाद्या मुलाच्या कार्यक्रमात सारखी, पाळणे, कपडे व फुलांचा आरास व सजावट करण्यात आली होती 


 घराची सजावट ,रंगरंगोटी ,रांगोळ्या व मांडवाचे नियोजन ही करण्यात आले होते अशा या श्वानाच्या नामकरण सोहळ्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे
रितीरिवाजाप्रमाणे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्राणीमित्र अजित काशीद, संतोष पाटील,पल्लवी पाटील, वेदीका पाटील, अभिजित शिंदे सर्व पै पाहुण्या सह मान्यवर उपस्थित होते