कोल्हापूर; शिरोळमध्ये विधवा महिला प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर; शिरोळमध्ये विधवा महिला प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय




शिरोळमध्ये विधवा महिला प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय

नगरपरिषदेच्या विशेष सभेत सर्वानुमते ठराव सहमत


शिरोळ प्रतिनिधी


येथील नगरपरिषदेत मंगळवारी झालेल्या विशेष सभेमध्ये विधवा महिला प्रथेवर बंदी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह विविध तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचे ठराव केले आहेत. मात्र, असा निर्णय आत्तापर्यंत कोणत्याही नगरपरिषदेने घेतला नव्हता. त्यामुळे विधवा प्रथेवर बंदी घालणारी शिरोळ ही महाराष्ट्रातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.
     विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. उपनगराध्यक्ष तातोबा पाटील यांनी विधवा अनिष्ठ प्रथा बंदीचा ठराव करण्यात यावा अशी सूचना मांडली याला कमलाताई शिंदे यांनी अनुमोदन दिले. या ठरावाच्या अनुषंगाने सभागृहात पाऊन तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते विधवा प्रथा बंदीचा ठराव सहमत करण्यात आला. नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील विधवा महिलांना दिलासा मिळणार आहे. मात्र प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याचे आव्हान नगरपरिषदेबरोबर सर्व नगरसेवकांना पेलावे लागणार आहे.
                                      पतीचे निधन झालेल्या महिलेचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे
यासारख्या अनिष्ठ प्रथामुळे विधवांची विवंचना व कुचंबना होते. हे सर्व ज्ञात असले तरी प्रथा बंदी विषयी एकमुखी ठराव करण्यासाठी शिरोळ नगरपरिषदेने सर्वप्रथम पुढाकार घेऊन अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. जसे ग्रामपंचायतीमध्ये हेरवाड गावाने सर्वप्रथम निर्णय घेतला. तसा शिरोळ नगरपरिषदेने निर्णय घेऊन विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याच पद्धतीने इतर नगरपरिषदांनी प्रथा बंदीचा निर्णय घ्यावा. असे आवाहन उपनगराध्यक्ष पाटील यांनी केले.

चौकट : शिरोळ तालुका सर्वात पुढे

विधवा प्रथा बंदीचा निर्णय पहिल्यांदा हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला, त्यानंतर शिरोळ नगरपरिषदेने प्रथा बंद करून समाजीक सन्मान देण्याचा निर्णय घेतला.असा निर्णय घेणारे हेरवाड गाव हे ग्रामपंचायत स्तरावर आणि नगरपरिषद स्तरावर शिरोळ शहर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत.