Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारने नुकत्याच नव्याने चालू केलेल्या अग्निपथ सैन्य भरती योजना बंद करावी: या योजनेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र विरोध-जैलाब शेखमिरज लोकसंदेश वार्ताहर; इरफान बारगीर
केंद्र सरकारने नुकत्याच नव्याने चालू केलेल्या अग्निपथ सैन्य भरती योजना बंद करावी: या योजनेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र विरोध*:*जैलाब शेख

अग्निपथ या सैन्यभरती प्रक्रियेला महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात तीव्र विरोध होत आहे.भारतातील युवक भविष्याची पुंजी म्हणून सरकारी नोकरीकडे पहात असताना केंद्र सरकारने मात्र सैनिक भरती मध्ये अगदी तरुण वयातील चार वर्ष नोकरी झाल्यानंतर पुढील कोणती हमी अग्नीपथ सैन्यभरती या योजनेमध्ये केंद्र सरकारने दिलेली नाही.यापूर्वीही अनेक देशपातळीवर विद्यार्थ्याने सैन्य भरतीसाठी शारीरिक व वैद्यकीय चाचण्या देऊन पास झालेल्या युवकांना अद्याप नियुक्ती झालेली नाही या सर्व बाबींचा विचार करून सरकारने अग्निपथ योजना त्वरित बंद करावी
या योजनेच्या विरोधात देशातील अनेक तरुण रस्त्यावर उतरलेला आहे तरुणाचा रोषामुळे देशात अनेक राज्यात या योजना विरुद्ध आंदोलने चालू आहे या योजने विरुद्धचे आंदोलनाने हिंसक व उग्र स्वरूप धारण केलेले आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसक वळण सुद्धा लागलेला आहे.या योजनेमुळे देशातील अनेक तरुण बरबाद होणार आहे देशाच्या शांततेसाठी ही योजना बंद करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरज प्रांताद्वारे प्रधानमंत्रीना निवेदन पाठवण्यात आले यावेळी एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष जावेद मनेर मिर्झा शेख,अक्रम दाढेल,नासिर शेख आधीच कार्यकर्ते उपस्थित होते 20/6/2020 मिरज