BREKING NEWS म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

BREKING NEWS म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या*


म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या



*म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या*

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सांगली जिल्हा हादरला

प्रतिनिधी ;लोकसंदेश न्यूज नेटवर्क 
सांगली जिल्हा
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 


कर्जबाजारी पणातून विष घेतले?

सदर कुटुंबाने कर्जबाजारी पणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वनमोरे (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

    घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहण्यास आहेत. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडला नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण मृतावस्थेत दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. 


   याबाबत येथील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान  या घटनेमुळे सांगली जिल्हा गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सांगली