गरिब मुलीच्या शिक्षणासाठी माजी सरपंच संदीप कारंडे यांचा दातृत्वाचा हात, शिक्षणासाठी संजीवनी गैणे हिला घेतले दत्तक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गरिब मुलीच्या शिक्षणासाठी माजी सरपंच संदीप कारंडे यांचा दातृत्वाचा हात, शिक्षणासाठी संजीवनी गैणे हिला घेतले दत्तक

कोल्हापुर ;
कुंभोज लोकसंदेश वार्ताहर (विनोद शिंगे)

 हातकलंगले येथे पालक दिनाचे औचित्य साधून युवा नेते व हातकलंगलेचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला यामध्ये त्यांनी खोतवाडी येथे राहणाऱ्या संजीवनी सचिन गैने या परिस्थितीने अत्यंत गरीब असणाऱ्या व आई वडिलांचे छत्र हरपलेल्या पण शाळेत अत्यंत हुशार असणाऱ्या विद्याथिनीला पुढील शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संजीवनी चे शैक्षणिक गुणवत्ता पाहता तिला आधार देणे गरजेचे आहे. म्हणूनच पालक दिनाचे औचित्य साधून आपण तिचे पालकत्व स्वीकारत असल्याचे मत युवा नेते संदीप कांरडे यांनी मानले.
            त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज त्यांनी सोनाली उद्योग समूह हातकणंगले येथे कुमारी संजीवनी गैने या विद्यार्थिनीला नववी साठी आवश्यक असणारे सर्व शालेय साहित्य देऊन दहावीचा सर्व खर्च व पालकत्व आपण स्वीकारत असल्याचे सांगितले.
       समाजात अनेक ठिकाणी अत्यंत गरीब परिस्थितीत काही विद्यार्थी बुद्धिमत्ता असूनही केवळ परिस्थितीमुळे शिक्षणात मागे पडत आहेत. अशा विद्यार्थ्यांना पाठबळ देणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या सहकार्यासाठी कारंडे परिवार कधीही कमी पडणार नाही असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. परिस्थितीने अत्यंत गरीब असणाऱ्या संजीवनी ही सध्या आश्रम शाळा हातकणंगले येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेत असून तिने आठवी मध्ये 82 टक्के गुणवत्ता प्राप्त केली आहे .परिणामी नववी व दहावीच्या खर्चाचा बोजा खुपच असून ,आई-वडील नसलेने केवळ आजीकष्ट करुन सदर मुलींचा सांभाळ करत असून पुढिल शिक्षणाचा विषय  सतत मनात घोळत होता.यासाठी अंगणवाडी मदतनीस सुषमा मनीष कांबळे,व सेविका निमला पाटील यांनी मदतीचे आव्हान केले होते,व त्याला हातकणंगले माजी सरपंच संदिप कांरडे,पत्रकार विनोद शिंगे यांनी तत्काळ प्रतिसाद दिला, परिणामी कारंडे यांच्या सहकार्यामुळे एका गरीब मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होणार असून, त्यांची हीच मदत खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली असेल.असे मत विनोद शिंगे यांनी व्यक्त केले.
   यावेळी मनीष कांबळे, विनोद शिंगे,नरेश गायकवाड, सुषमा कांबळे,निर्मला पाटील,रुपाली कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड, कोल्हापुर