🔴कोळकेवाडी धरणाबाबत महत्वाचे निवेदन🔴
RATNAGIRI
चिपळूण - कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत, मौजे कोळकेवाडी येथे बोलादवाडी नाल्यावर धरण बांधण्यात आले आहे. याची पाणी साठवण क्षमता ०१.२५ TMC एवढी आहे. धरण जलाशयाचा संतुलित जलाशय म्हणून वापर होतो.
कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा १ व २ पोफळी वीजगृह आणि टप्पा ४ कोळकेवाडी वीजगृह येथून वीजनिर्मिती नंतर येणारे पाणी कोळकेवाडी धरणात येऊन धरण पायथा येथील वीजगृहातून पुर्नवीज निर्मिती करून, हे पाणी अवजल कालव्याद्वारे मौजे दळवटणे गावाजवळ नियंत्रितपणे सोडले जाते. कालव्याची संकल्पीय महत्तम जलवहन क्षमता 320 mm3 एवढी आहे.
वीजनिर्मिती ही अतिउच्च वीज मागणी वेळी महानिर्मिती कंपनी, पोफळी यांचे मार्फत केली जाते. धरणाचे रॉडयल गेट (द्वारे) उघडून सांडव्यावरून कधीही पाणी सोडले जात नाही.
पावसाळी हंगामामध्ये धरणाचे परिचलन करणे व माहिती प्रसारित करणेची कार्यवाही प्रमाणित कार्यप्रणालीनुसार केली जाते. जसे की, पूरनियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवणे, जलपातळीची प्रत्येक तासाला नोंद घेणे, पर्जन्यमान नोंदी घेणे, दर दिवशी सकाळी ८.०० वाजता वीजनिर्मिती बाबत वरिष्ठ कार्यालयास SMS / फोनद्वारे देणे, जिल्हा पूरनियंत्रण समन्वयक कार्यालय कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, (द.) रत्नागिरी व कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकामे विभाग, चिपळूण यांना देणे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून सायरनची व्यवस्था दोन ठिकाणी करण्यात आली आहे. १) धरणमाथा २) मौजे अलोरे व नागावे गावाचे हद्दीत मंदार कॉलेज जवळ शिवाय संबंधित ग्रामपंचायत यांना लेखी तसेच मोबाईल, दुरध्वनीवरून पुर्व कल्पना देणे, स्पीकरवरून दवंडी देणे, पोलिस ठाणे, शिरगांव, तहसिलदार चिपळूण, प्रांताधिकारी चिपळूण, मुख्याधिकारी, चिपळूण नगरपरिषद, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पूर्वकल्पना देणे. प्रकल्प रुग्णालय यांची आरोग्य विषयक मदत घेणे इत्यादी कार्यवाही करणेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकामे विभाग, चिपळूण हे समन्वय अधिकारी आहेत. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा यांचे अधिनस्त कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतात व सह नियंत्रक म्हणून उपविभागीय अभियंता कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग, अलोरे काम पाहतात.
तरी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये. अधिक माहितीसाठी कोळकेवाडी धरण स्थळी संपर्कासाठी खालील अधिकारी /कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. दिपक गायकवाड, उपविभागीय मोबा. नं. ७०६६७८५१००, दिपक द. हिवरे, आरेखक, श्रेणी-१ मोबा. नं. ९६२३६६९६११ तसेच राज्यातील विविध पर्जन्यमापन व सरितामापन केंद्रामधील पावसाची व नदी पातळीची अधिकृत माहिती http://mahartdas.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून ती दर तासाला सुधारीत केली जाते, असे उपकार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी कळविले आहे.
https://bit.ly/3A5B1R2
जनहितार्थ ;
लोकसंदेश न्यूज़ मीडिया प्राइवेट लिमिटेड ,मुंबई