महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के .





महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुली आघाडीवर आहेत. मुलींचा निकाल 97.96 टक्के जाहीर झालाय आणि मुलांचा निकाल 96.06 टक्के आहे. राज्यात एकूण 9 विभागीय मंडळांअंतर्गत परीक्षा पार पडली.

गेल्यावर्षी निकालाची टक्केवारी 99.95 होती. तसंच 2020 मध्ये 95.30 टक्के निकाल जाहीर झाला.

कोणत्या विभागाचा निकाल किती?

कोकण विभागाचा निकाल सार्वाधिक असून नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.

बोर्ड परीक्षा निकालांमध्ये मुलीची नेहमी प्रमाणे मुलांवर मात ....

महाराष्ट्रातील सर्व विभागातील टक्केवारी...
पुणे: 96.96%
नागपूर: 97
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81 %
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%

दहावीचं वर्ष शैक्षणिक जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना यश मिळावं, अशी शुभेच्छा मंत्री गायकवाड यांनी दिल्या आहेत.