आषाढीवारीच्या दिंडीचा झालेल्या अपघातात सतरा जण गंभीर जखमी झाले होते ..त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्राथमिक मदत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आषाढीवारीच्या दिंडीचा झालेल्या अपघातात सतरा जण गंभीर जखमी झाले होते ..त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्राथमिक मदत



SANGLI/MIRAJ

आषाढीवारीच्या दिंडीचा झालेल्या अपघातात सतरा जण जखमी झाले होते ..त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्राथमिक मदत..


कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील १७ वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलव्दारे संवाद साधला.


 यावेळी वारकऱ्यांना काळजी करू नका, लवकर बरे व्हा... अशा शब्दात दिलासा दिला.


अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांना सर्व जखमी वारकऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यात यावी, 

मिरज सिव्हील येथील वैद्यकीय उपचारांव्यतिरीक्त अन्यत्र खाजगी ठिकाणी उपचारांची आवश्यकता असल्यास त्याचाही सर्व खर्च शासन करेल. जखमी वारकऱ्यांची मागणी असल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलविण्याबाबतही कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी केले.

 यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली