कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्यावर विविध कार्यक्रम संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्यावर विविध कार्यक्रम संपन्न



कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्यावर विविध कार्यक्रम संपन्न

KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी विनोद शिंगे

हुपरी, दि. ५ जुलै कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक


चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना व कामगार संघटना (इंटक) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 


कारखान्याच्या संचालकांच्या शुभहस्ते वृक्षारोपण व रक्तदान शिबीर आणि हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबीरासाठी लायन्स ब्लड बँक इचलकरंजी, आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर, आधार ब्लड बँक इचलकरंजी आणि संजीवनी ब्लड बँक कोल्हापूर या ब्लड बँकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी १६० कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून बहुमूल्य योगदान दिले.


मार्च, २०२२ मध्ये झालेल्या इ.१० वी आणि १२ वी परीक्षेमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणी मुलांचा व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी बी. जी. कुरवलकर व कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूरचे श्री. विजय शिंगाडे यांच्या हस्ते रोख रक्कम पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. 


कर्मचाऱ्यांच्या ७५ मुला-मुलींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी २४ व्या कामगार प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या शुभारंभाप्रसंगी मागील कामगार प्रशिक्षण वर्गातील प्रथम क्रमांक विकास पर्वते, द्वितीय अनिल कांबळे, तृतीय सूरज कणिरे व
उत्तेजनार्थ सौरभ कुलकर्णी या प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्र देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात जवाहर कारखान्याचा एक वेगळा ठसा असून आवाडेदादा आणि आमदार प्रकाशआण्णांनी सुरुवातीपासूनच विविध कामगार कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवण्यावर भर दिलेला आहे. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेऊन कामगारांच्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमामुळे कामगारांचे कौटुंबिक व एकंदरीत जीवनमान उंचावले आहे असे विचार शिक्षणाधिकारी बी. जी. कुरवलकर यांनी मांडले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे कौतुक करून जवाहर आपल्या कामगारांच्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी असे कार्यक्रम घेते. तसेच पश्चिम महाराष्ट्रात कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यात जवाहर कारखाना आघाडीवर असतो. त्याचबरोबर पाठ्यपुस्तक योजना, एमएससीआयटी, असाध्य रोग सहाय्यता निधी, भजन व समर गीत स्पर्धा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रम व योजनांचा लाभ मिळवून दिला जातो.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी म्हणाले, सध्या स्पर्धेच्या युगात कामगारांना प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याने अशा प्रशिक्षणामुळे कामगारांच्या जीवनात बदल होऊन त्याचा चांगला परिणाम कारखान्याच्या उत्पादकतेवरही होतो. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचेही विविध उपक्रम आणि कोर्सेस दरवर्षी कारखाना व कामगार संघटना यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात त्याचा लाभ कामगार घेत आहेत. शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा निवडताना जे आपण शिक्षण घेणार आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा. पैसा ही संपणारी वस्तू आहे पण ज्ञान कधीही संपत नाही. तसेच माणूस आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. कारखान्याच्या विविध स्तरावरील कामगीरीचा आलेख नेहमी चढता ठेवण्यासाठी आमचे आधारस्तंभ संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा आणि प्रेरणास्थान आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचे बहूमूल्य मार्गदर्शन लाभले 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली