कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणी पातळी 8 फुटांनी वाढली, 15 बंधारे पाण्याखाली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणी पातळी 8 फुटांनी वाढली, 15 बंधारे पाण्याखाली



KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी, विनोद शिंगे 

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणी पातळी 8 फुटांनी वाढली, 15  बंधारे पाण्याखाली


राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत पंचगंगेची पाणी पाचळी 8 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24.8 फुटांवर गेली आहे. त्यामुळं नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


कालपासून कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. या पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. कालच्या एका रात्री पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 8 फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 24.8 फुटांचवर पोहोचली आहे. या पावसामुळं जिल्ह्यातले 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, 


काल दिवसभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्याही पावसाची संततधार सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पश्चिमेकडचे जे तालुके आहेत, त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली