निरोगी आरोग्यासाठी बी. व्हिटॅमिनची आवश्यकता' ; डॉ.अशोक अँटोनी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

निरोगी आरोग्यासाठी बी. व्हिटॅमिनची आवश्यकता' ; डॉ.अशोक अँटोनी



SANGLI
सांगली लोकसंदेश प्रतिनिधी

निरोगी आरोग्यासाठी बी. व्हिटॅमिनची आवश्यकता' ; डॉ.अशोक अँटोनी

 फॉलिक ऍसिड आणि बी ब १२ व्हिटॅमिनच्या कमरतेमुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये मेंदू व शरीराचे अनेक दोष उद्भवतात. भारतामध्ये दरवर्षी अशी सव्वा लाख बालके जन्माला येतात. यासाठी स्त्रियांनी फॉलिक अॅसिड आणि बी बारा व्हिटॅमिनचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेतील डॉ. अशोक ॲटोनी यांनी व्यक्त केले


.सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे व्याख्यानमालेत आयक्यूएसी आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'हेल्थ आणि हायजीन' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते

या वेळी डॉ.रवींद्र व्होरा यांनी ही दोन्ही व्हिटॅमिन प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांच्या आहारापर्यंत कशी पोहचवता येतील याची माहिती दिली. त्याचाच एक भाग म्हणून चहाच्या माध्यमातून ही विटामिन पोहोचवता येतील असे सांगितले

                 प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी  यांनी 

                   स्वागत व प्रास्ताविक केले.

        यावेळी वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. लताताई देशपांडे उपस्थित होत्या.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली