बेरोजगार युवकांना उद्योगासाठी सहकार्य करा : जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बेरोजगार युवकांना उद्योगासाठी सहकार्य करा : जिल्हाध्यक्ष संदेश भंडारेबेरोजगार युवकांना उद्योगासाठी सहकार्य करा : जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे
राज्याचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्याकडे केली मागणी.

SANGLI
तासगाव प्रतिनिधी - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योगासाठी सहकार्य करावे अशी मागणी रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेशभाऊ भंडारे यांनी केली. 
उद्योग मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे पुणे विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांना भेटून केली. यावेळी सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक संतोषकुमार गवळी उपस्थित होते.


     उद्योग मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे पुणे विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे सांगली जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर आले होते यावेळी रिपब्लिकन पक्षाचे लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे यांनी भेटून जिल्ह्यातील बेरोजगार युवक व विविध शासकीय योजना आणि बँकांचे धोरण यावर चर्चा केली, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाने मदत करावी, उद्योग मंत्रालयातून विशेष कार्यक्रम आखावा अशी मागणी केली. याप्रसंगी उद्योग मंत्रालय  उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे व सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक संतोषकुमार गवळी यांनी शासनाची सगळी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी विजय कांबळे, अनिल कांबळे, नजीर मुजावर, मुन्ना कोकणे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब वाडकर, प्रवीण मोरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे पुणे विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांचा सत्कार करताना रिपाई लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, सोबत सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक संतोषकुमार गवळी व इतर मान्यवर....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली