SANGLI
लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी ,किरण कांबळे
मिरज :राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मा. विश्वजीत कदम व जयंत पाटील यांच्या प्रतिमेची विटंबना करून अवमान केल्याप्रकरणी संबंधितावर कडक कारवाई करा.. मिरज शहर पोलिस स्टेशन ठाण्याकडे तक्रार दाखल
मागील अनेक वर्षापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा मुद्दा प्रलंबित होता. दि. 29/06/2022 रोजी महाराष्ट्रात अस्तित्वात असणा-या महाविकास आघाडी सरकारने या दोन शहरांचे संभाजीनगर आणि धाराशीव असे नामांतर करण्यास मंजुरी दिली.
त्यानंतर महाराष्ट्रातील बहूसंख्य जनतेने आणि पक्ष तसेच संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले ..काहींनी याचा विरोधही केला याचे पडसाद मिरजेतही उमटले आणी यावेळी AIMIM चे पदाधिकारी महेशकुमार कांबळे आणी त्याच्या सहका-यांनी या निर्णयाचा निषेध नोंदविण्याकरीता त्यांच्या किल्ला भागातील कार्यालयाच्या समोर महाविकास आघाडी तसेच नामदार, डॉ. विश्वजीत कदम, नामदार जयंतरावजी पाटील ,यांच्या नांवाने धिक्कार करून तसेच मा.ना. कदम यांच्या प्रतिमेवर जोडे मारुन त्यांची मानहानी तसेच अपमान केला आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक स्वास्थ्य आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.
ना. कदम हे आमचे पक्षाचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या प्रतीमेचा अशा पध्दतीने केलेला अवमान आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही. आमची आपणाकडे मागणी आहे की, महेशकुमार कांबळे आणी त्यांच्या सहकार्यावरती सामाजिक स्थास्थ्य बिघडविणेचा तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलेबद्दल कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मा. ना. कदम यांची मानहानी व त्यांना अपमाणित केल्याबद्दल भारतीय दंड विधान संहिता 502 व 503 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अशा मागणीचे निवेदन आज मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले,
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे, धनराज अनिल सातपुते, धनंजय भिसे, वसीम रोहिले, मनोज कुमार कांबळे, माणिक जे फर्नांडिस, प्रकाश सातपुते, श्रीनाथ देवकर, मुस्ताक रोहिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली