"संजय घोडावत फौंडेशन'' तर्फे टेनिसपट्टू ऐश्वर्या जाधवला मोफत शिक्षण सुविधा देणार: संजय घोडावत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

"संजय घोडावत फौंडेशन'' तर्फे टेनिसपट्टू ऐश्वर्या जाधवला मोफत शिक्षण सुविधा देणार: संजय घोडावतKOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर

"संजय घोडावत फौंडेशन'' तर्फे टेनिसपट्टू ऐश्वर्या जाधवला मोफत शिक्षण सुविधा देणार :   संजय घोडावत 

खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल घोडावत इंटरनॅशनल स्कुलने केले सन्मानित...


 संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मार्फत कोल्हापूरची कन्या विम्बल्डन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव हिचा घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. टेनिस खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सत्कार समारंभ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलत असताना संजय घोडावत म्हणाले... ''ऐश्वर्याने पुढील शिक्षण या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल मध्ये घ्यावे तिचा सर्व खर्च संजय घोडावत फाउंडेशन करेल तिच्या खेळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील,  तसेच घोडावत स्कुल मध्ये सिंथेटिक टेनिस कोर्ट ची सुविधा उपलब्ध आहे. सध्या राज्यात ग्रास कोर्ट खूप कमी आहेत. भविष्यात येथील गरजू खेळाडूंसाठी घोडावत इंटरनॅशनल स्कुल मध्ये ग्रास कोर्ट उभारू अशी ग्वाही दिली. 


ऐश्वर्या हिने प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा खेळल्याबद्ल तिचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. ऐश्वर्या ही कोल्हापूरची असल्यामुळे तिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ती एक दिवस नक्कीच विम्बल्डन जिंकेल व कोल्हापूर व भारताचे नाव जगभरात उंचावेल अशी आशा संजय घोडावत यांनी व्यक्त केली''
यावेळी ऐश्वर्या सोबत असणारे प्रशिक्षक हर्षद देसाई व मनल देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. ऐश्वर्याची आई अंजली जाधव व वडील दयानंद जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलत असताना ऐश्वर्याने आपले काही अनुभव सांगितले. खेळ व  अभ्यास यांची सांगड कशी घालावी, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्टाची तयारी कशी करावी लागते याबद्दल तिने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून ऐश्वर्याशी संवाद साधला. तिचा खेळ व जीवन परिचय जाणून घेतला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई