बापापुढे पूरही हरला...तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने काढला मार्ग.. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे का!! आदिवासी जंगलात राहतो अशी विचारणा.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बापापुढे पूरही हरला...तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने काढला मार्ग.. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे का!! आदिवासी जंगलात राहतो अशी विचारणा.



Chandrapur
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी 

बापापुढे पूरही हरला, तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने काढला मार्ग...

महाराष्ट्र प्रगत राज्य आहे का !! आदिवासी जंगलात आम्ही राहतो का अशी विचारणा....

पोराला वाचवण्यासाठी बाप चक्क पुराला भिडल्याची घटना समोर आली आहे. तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन त्याने पाण्यातून मार्ग काढला....

गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आज सकाळची ही घटना असून या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे.


वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलंय. त्यातच श्यामराव गिनघरे यांचा मुलगा कार्तिक तापाने फणफणत होता...

गावात दवाखाना नसल्याने शामराव यांनी मुलाला कडेवर घेऊन या पुरातून वाट काढली.
गावापासून 5 किलोमीटरवर असलेल्या वेडगाव येथील खाजगी डॉक्टरचे त्याने घर गाठले.


तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन एका बापाने पुरातून वाट काढल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आज सकाळची ही घटना असून या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. 
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलंय. त्यातच श्यामराव गिनघरे यांचा मुलगा कार्तिक तापाने फणफणत होता. गावात दवाखाना नसल्याने शामराव यांनी मुलाला कडेवर घेऊन या पुरातून वाट काढली आणि 5 किलोमीटर वर असलेल्या वेडगाव येथील खाजगी डॉक्टर चे घर गाठले.

महाराष्ट्र राज्यात मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या व राज्य शासन अधिकारी व लोकप्रतिनिधीना ही एक चपराक आहे... 

आम्ही फार प्रगत वगैरे झालो आहे... आता मेट्रो वगैरे चालू करायचीआहे... रस्ते चांगले करायचे आहेत...फक्त या मोठ्या गप्पात राहून, आज  ग्रामीण भागाकडे कोणत्याही शासनाचे लक्ष नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे... महाराष्ट्रास प्रगत वगेरे म्हनवणाऱ्या राज्यामध्ये, खेडे,वाडी वस्ती, व गावात एखादा आरोग्य दवाखाना नसणे ही लाजिरवाणी बाब आता जगासमोर आलेली आहे.

 एक बाप आपला मुलाला कडेवर घेऊन,एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना कावडी करून, पाठीवर घेऊन, वाडी वस्तीतून दवाखान्यापर्यंत दहा किलोमीटर पर्यंत जातो. .
 याला आपण काय म्हणावे. . शासनकर्त्यांनो एखाद वेळेस त्यांना पाणी देऊ नका . एखाद वेळेस त्यांना वीज देऊ नका.. परंतु आरोग्य सारख्या गंभीर बाबीवर थोडा विचार करून वाडी वस्तीमध्ये आपले राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामीण भागात एखादा दवाखाना उघडता येईल का पहावे, अन्यथा आपली नाचक्की ही जगभरात होणारच आहे ...
.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशाच एका महाबळेश्वर जवळील दरे गावातून दुर्गम भागातून येत आहेत.... माझ्यामते त्यांना ह्या वस्तुस्थितीची जाण असावी ...त्यांनी तातडीने अशा वाड्या, वस्त्यावर या दुर्गम भागांच्या लोकांसाठी शासनामार्फत सोय करावी हीच विनंती...
 संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया मुंबई.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली