पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारला ट्रकची धडक तीन ठार, एक जखमी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारला ट्रकची धडक तीन ठार, एक जखमीपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारला ट्रकची धडक
तीन ठार, एक जखमी

महामार्गावर निष्काळजीपणे थांबविलेल्या कंटेनरमुळे अपघात

KOLHAPUR
पेठ वडगाव लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ महामार्गावर नादुरुस्त होवून थांबलेल्या कंटेनरला पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची धडक बसली तर याच कारला पाठीमागून ट्रकने धडक दिली. 


या अपघातात कारमधील तिघेजण ठार झाले तर एक जखमी झाले आहे. अपघातातील मयत हे कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील आहेत

      या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ रात्रीच्या सुमारास महामार्गावर गाडीचा अक्स्ल तुटल्याने महामार्गावरच आयशर कंटेनर लावण्यात आला होता. कंटेनर लावताना कोणतीही दक्षता घेतली नव्हती. दरम्यान रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमास कर्नाटक राज्यातून बेंगळूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची या महामार्गावर थांबलेला कंटेनर रिफ्लेक्टर अथवा बॅरिकेट अशी कोणतीही दक्षता न घेता लावण्यात आल्याने लक्षात आला नसल्याने ही कार पाठीमागून कंटेनर मध्ये घुसली. दरम्यान काही क्षणातच पाठीमागून आलेला ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिली.


      या धडकेत कारमधील त्रिलोकेश कुमार (वय४२), संजना माहेश्वरी (वय२७), जिथ्या त्रिलेश (वय२१, सर्व रा. साईकापल्ली मीनाक्षीनगर, कामाक्षीपल्ल्या, बेंगलोर राज्य-कर्नाटक) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अरिनी एन.(वय४१, बसवेश्वर नगर बेंगलोर) या गंभीर जखमी झाल्या.

      अपघातस्थळी पोलीस व होमगार्ड धोंडीराम वड्ड (रा.किणी,ता.हातकणंगले) यांनी धाव घेवून वाहतूक सुरळीत करून गाडीतील मयत व जखमींना गाडीबाहेर काढले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली